Dec
05

आपला व्यवसाय यशस्वी कसा होईल ?

आज आपण आपल्या छोट्याश्या व्यवसायाला यशस्वी कसे बनवाल हे जाणून घेऊया.

 सर्वात महत्त्वाचे म्हणजे …

१. तुमचा ग्राहक कोण आहे ते शोधा ?

कुठलाही व्यवसाय करण्याच्या  आधी तुमचा ग्राहक कोण आहे ते शोधलं पाहीजे. उदा. एखाद्या स्टायलिश कपड्यांच्या दुकानातला ग्राहक मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय असेल, ते कपडे घेण्याची लो इन्कम ग्रुप मधल्या लोकांची ऐपत नसेल, तेव्हा टारगेट कस्टमर शोधा, त्यांच्याशी संपर्क वाढवा.

कॉलेजची मुले, स्टायलिश राहतात, त्यासाठी खर्च करण्याची त्यांची तयारी असते, मग जमल्यास त्यांची एखादी मोठी गॅदरींग, एखादा इव्हेन्ट स्पॉन्सर करा. आपली जाहीरात आपल्या संभाव्य ग्राहकाला, आपल्यापर्यंत घेऊन आली पाहीजे.

२. आकर्षक लोगो आणि टॅगलाईन तयार करा ..

लोगो असणं, खुप आवश्यक आहे, कालांतराने ती आपली ओळख बनतं. सर्वप्रथम कुठेही, आपलं लक्ष पहील्यांदा लोगोवर जातं. नकळत ग्राहकाच्या मनात आपली ‘ब्रॅंड बिल्डींग’ चालु होते. लोगो ग्राहकांच्या मनावर लवकर ठसतो. ब्रॅंड आहे म्हणजे चांगलाच असणार असे आपल्या बाजुने त्याचे विचार आपोआप वळु लागतात.

लोगो असा असावा, की अधिक माहीती न सांगता तुमचं उत्पादन, किंवा तुमची सेवा, चटकन ग्राहकाला कळाली पाहीजे, जर तुमच्या लोगोतुन तुमच्या व्यवसायाचा बोध होत नसेल, तर लोगो बदला, अधिक सुलभ, अधिक आकर्षक करा.

लोगोमुळे तुमचा व्यवसाय इतरांपेक्षा वेगळा असा, उठुन दिसतो. तुम्हाला डिझाईन येत नसेल तर प्रोफेशनल लोकांची मदत घ्या, देखणा लोगो बनवुन व्हिजीटींग कार्ड, ऑफीस, दुकानाचा डिस्प्ले, जाहीराती यात मनसोक्त त्याचा वापर करा. ती तुमची युनिक ओळख बनते.

३. आपल्या व्यवसायच एक विशिष्ट ध्येय ठरवा ..

आपण करत असलेला व्यवसाय बाजारात हजारो लोक करत आहेत, तेव्हा तुम्ही तुमच्या ग्राहकाला काहीतरी वेगळं दिलं पाहीजे, तर तो तुमच्याकडे आकर्षित होईल आणि तुमच्या वेगळेपणामुळे कायमचा ग्राहक बनेल. तुमचा प्रॉडक्ट इतरांपेक्षा कसल्या ना कसल्या प्रकारे सरस असला पाहीजे.

ग्राहकाला तुम्ही काय देणार आहात हे स्पष्ट करणं, म्हणजे व्हिजन आणि मिशन स्टेटमेंट. तुमचं व्हिजन आणि मिशन तुमच्या व्यवसायाला पुढे घेऊन जाण्यात खुप मदत करतं. पदोपदी तुम्हाला मार्गदर्शन करतं.

नाईके जगातली शुज बनवणारी एक उत्कृष्ट कंपनी, त्यांचे मिशन स्टेटमेंट आहे, तुम्ही एथलिट असाल आमचे शुज वापरा, ते बेस्ट आहेत. त्यांनी सोबत अजुन एक वाक्य जोडून स्वतःला व्यापक केले.

“ज्याच्याकडे बॉडी आहे, तो एथलिट आहे.” नकळत त्यांनी प्रत्येकाला स्वतःचा ग्राहक बनण्याचं निमंत्रण दिलं.

आपण आपल्या संभाव्य ग्राहकाला आपल्याकडे येण्याचं, निमंत्रण देतो का? …… जो ग्राहक आला, त्याला वेगळी आणि खास ट्रीटमेंट देतो का?….दर्जेदार आणि आगळवेगळं उत्पादन, सेवा देतो का?

काहीतरी वेगळं म्हणजे तुमचा नम्रपणा असु शकतं, तुमचा प्रामाणिकपणा, तुमची कस्टमरबद्दल आपुलकी, तुमचं त्यांना आदरानं बोलणं हेही असु शकतं, आजकालच्या प्रोफेशनल जगात बहुतांश लोक आपापल्या तोऱ्यात वावरत असतात, तेव्हा मन जिंकुन, माणसं आपलीशी करण्याराला तसा बराच स्कोप आहे.

 ४. स्वतःमधल्या कमतरता शोधा ..

मार्केटवर बारकाईने लक्ष ठेवुन, तुमचे स्पर्धक कोणत्या बाबतीत वरचढ आहेत, त्याचा अंदाज घ्या. मग स्वतःमध्ये सुधारणा कशी करता येईल, ते शोधा. उदा. नवीन सॉफ्टवेअर शिकणं, ऑफीसला, दुकानाला, चांगलं इंटीरीअर बनवणं, मनुष्यबळ वाढवणं, व्यवसायाला उपयोगी पडणार्या नवनव्या स्किल्स शिकणं.

आपला स्पर्धक आपल्यापेक्षा लोकप्रिय असेल तर आपण आणखी कायकाय केल्याने त्यापेक्षा जास्त चांगले बनु याचा सतत विचार करा.

५.आपल्या व्यवसायाची चांगली मार्केटिंग करा…

आपलं प्रॉडक्ट खुप छान आहे हे फक्त आपल्याला  माहीत असुन चालणार नाही, त्याला जगासमोर आकर्षक स्वरुपात मांडावं लागेल.

घरात वाट बघत बसल्याने कस्टमर येत नाही. पहीले काही हजार कस्टमर तुम्ही शोधा, तुमच्या उत्पादनात खरच दम असेल तर नंतर कस्टमर तुम्हाला शोधत येतील.त्यामुळे आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करा.मार्केटिंग मध्ये आपण अनेक गोष्टी करू शकतो जसे ..सोशल मिडीया , वेगवेळ्या business listing site वर आपलं व्यवसाय listing करणे , पोम्पलेट ,ई..
आपला व्यवसाय kalpataroo वर listing करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा..
KALPATAROO हे  FACEBOOK पेज लाईक करण्यासाठी येथे CLICK करा

धन्यवाद ….

 

 

 

 

 

 

 

 

One Comment

  • Vivek
    9 months ago

    Great ..

Leave a Reply