Dec
03

कोणता व्यवसाय सुरु करावा ?

      मी कोणता व्यवसाय करावा ?

    मागील काही वर्षात काही नवीन व्यवसाय जन्माला आलेत . जसे ऑनलाइन शॉपिंग, तिकीट बुकिंग, मोबाइल recharge सेंटर, Mobile चा विमा पण आलाय. आधी लोकांना दूरदर्शन पाहून मजा यायची पण आज शेकडो tv channels कमी पडून लोकांना youtube पाहिजे आहे.  मागील १० वर्षात काही व्यवसाय जन्माला आले तर काही मरण पावले. मग मी कोणता व्यवसाय करावा ?

आज Jack Ma यांनी चीन मध्ये Alibaba.com हि वेबसाईट सुरु केली, यामुळे अनेक छोटे व्यवसाय एकमेकांशी जोडले गेले. त्यामुळे छोटे व्यावसायिकांना फायदा झाला आणि अर्थातच त्याचा फायदा सामान्य लोकांना पण झाला.

Steve Jobs यांनी Apple कंपनी सुरु केली. Apple मुळेच फोन च्या जगात इतक्या झपाट्याने प्रगती झाली. आज आपण कितीतरी गोष्टींसाठी फोनचा वापर करतोय.

Bill Gates यांनी Microsoft कंपनी बनवली. त्यामुळे computer सहज वापरणे आज जगाला शक्य झाले. या सर्व लोकांनी जग बदलण्यात मदत केली नाही का ?

सांगण्याचा मुद्दा असा की, व्यवसाय करताना आपण आपल्या व्यवसायाच्या माधम्यातून या जगाला, मानव समाजाला काय देऊ शकतो याचा विचार करून आपण व्यवसायाला सुरवात केली पाहिजे.

 

KALPATAROO हे  FACEBOOK पेज लाईक करण्यासाठी येथे CLICK करा

 

 

 

Leave a Reply