Dec
12

टेस्‍ला मोटर्सच्‍या यशाचे रहस्‍य..


‘टेस्ला मोटर्स’ या बॅटरीवर चालणाऱ्या मोटार कंपनीची २००३ साली स्‍थापना झाली, तेव्हा इलॉन मस्क हे त्याचे सहसंस्थापक असले तरी प्रमुख भूमिकेत नव्हते. पुढे त्यांनी तो प्रकल्प आपल्या हाती घेतला आणि त्यांनी २००८ मध्ये आपली पहिली ‘टेस्ला रोडस्टर’ ही इलेक्ट्रिकल गाडी बाजारात आणून कंपनीकडे जगाचे लक्ष वेधून घेतले. २०१२ मध्ये त्यांनी ‘मॉडेल एस’ ही आलिशान इलेक्ट्रिकल मोटार आणली. बाजारात आणल्यापासून अवघ्या साडेचार वर्षांत त्यांनी जगभरात दीड लाख मोटारी विकल्या. गेली दोन वर्षे त्यांच्या मोटारीला सर्वोत्कृष्ट गटात सन्मान प्राप्त होत आहे.टेस्लाने केलेल्या अभ्यासातून त्यांच्या लक्षात आले होते की प्रदूषणमुक्त मोटार ही केवळ फॅशन आहे. श्रीमंतांना आपणही पर्यावरणस्नेही आहोत हे दाखवायचे असते. मात्र त्यांना गाडी मात्र स्टायलिश चालवायची असते. त्यामुळे मोटार फालतू दिसण्याऐवजी ती अत्यंत आकर्षक दिसेल याची काळजी घेत त्यांनी अन्य मोटारींना तुल्यबळ अशी जबरदस्त मोटार तयार केली. इतकी की हॉलीवूडचा सुपरस्टार लिओनार्ड डिकॅप्रियोने टेस्लाची मोटार चालवायला सुरुवात केली. मोटार म्हटली की ती स्टायलिश असायलाच हवी आणि ती बापुडी दिसण्याची आवश्यकता नाही, हे जाणवून त्यांनी नेमकेपणाने त्यावर काम करून यश मिळवले.

इलेक्ट्रिकल मोटारींबद्दल त्यांचे सौंदर्य, वेग, कार्यक्षमता आदीबद्दल अनेक शंका असतात; म्हणून ही गाडी लोक गंभीरपणे घेत नाहीत; त्याकडे एकतर फॅड म्हणून पाहतात किंवा हौस म्हणून! इलॉन मस्क यांनी मात्र हा दृष्टिकोन बदलण्यासाठी, गाडीला मुख्य प्रवाहातील वाहन मानले जावे आणि अन्य मोटारींशी त्याची स्पर्धा असावी, यासाठी काही महत्त्वाची पावले उचलली.

गेल्या वर्षी त्यांनी ‘मॉडेल ३’ मोटार लाँच केली आणि ती जगातील सर्वाधिक वेगवान असल्याचे सिद्ध करून दाखवले. बीएमडब्ल्यु आणि मर्सिडिज मोटारींच्याच दरात त्याहीपेक्षा अधिक वेगवान इलेक्ट्रिकल कार मिळत असल्याने ग्राहकांनीही त्याचे उत्तम स्वागत केले. फक्त अर्धा तास चार्जिंग करून सुमारे पावणे तीनशे किलोमीटर अंतर या कारने कापता येते. या यशाचे रहस्य काय, हे पाहण्यासारखे आहे.

 

टेस्लाचे तंत्रज्ञान इतके सरस आहे की डेम्लर, मर्सिडिज बेन्झ, टोयोटा आदी कंपन्या ते वापरतात. जनरल मोटर्सने तर टेस्लाच्या भविष्यकालीन वाटचालींचा वेध घेण्यासाठी एका खास टीमची नेमणूक केली आहे, असे म्हणतात.
त्याआधी आपल्याच सुमारे तीस हजार कर्मचाऱ्यांना ही मोटार विकून त्यांनी त्यातील अनेक दोष दूर केले. ग्राहकांपर्यंत कार जाण्याआधी कंपनीतच गाडी विकून चाचणी आणि विक्री एकत्रितच केली आणि एक महत्त्वाचा टप्पा कमी करण्याचा दूरदर्शीपणा दाखवला. (गाडीच्या दुरुस्तीसाठी ग्राहकाला अन्यत्र कोठेही जायला लागत नव्हते; फक्त कामाच्या ठिकाणीच गाडी आणली की झाले!)

त्यांना स्पर्धक नाहीत. कारण त्यांनी एका छोट्या ग्राहक वर्गासाठी उत्पादन बनवले आहे. उच्च प्रतीची इलेक्ट्रिक स्पोर्टस्कार. त्यामुळे या क्षेत्रात त्यांची मक्तेदारी असल्याने ते यशस्वी आहेत. तसेच, टेस्लात काम करणारे लोक हे कमांडो सारखे असतात. इलॉन मस्क त्यांच्याकडून कस लागेल असे काम करून घेतात. ते सामान्य दर्जा स्वीकारतच नाहीत, उलट अशक्यप्राय गोष्टींचा आग्रह धरतात.

वितरण ही त्यांची अजून एक महत्त्वाची बाजू. अनेक कंपन्या या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात, मात्र टेस्लाने ते सुरुवातीपासून मनावर घेतले. त्यासाठी त्यांनी अमेरिकेतील काही राज्यांशी संघर्ष करावा लागला तरी तो केला आणि आपली सेवा केंद्रे सुरू केली. ते वितरकांच्या जाळ्याविना थेट विक्री करत असल्याने त्यांना प्रारंभी खूप अधिक खर्च येत असला तरी भविष्यात त्यांना त्याचा अधिक फायदा होणार आहे. शिवाय, ग्राहकांचा अनुभव थेट प्राप्त होत असल्याने त्यांच्या ‘ब्रँड मूल्या’त भरच पडते.

 

आपला व्यवसाय KALPATAROO वर LISTING करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा..
KALPATAROO हे  FACEBOOK पेज लाईक करण्यासाठी येथे CLICK करा.

धन्यवाद …

2 Comments

 • Vikas jadhav
  11 months ago

  Impressive…

 • Vikas jadhav
  11 months ago

  Impressive…
  Nice story of tesla

Leave a Reply