Category: (6)

भारतीय वंशाचे जगातील top 5 ceo..

1.सत्या नदेला (Satya Nadela)

 • CEO: मायक्रोसॉफ्ट(Microsoft)
 • पगार:560 करोड़ रुपये वार्षिक  (84.3 millones dollers)
 • दिवसाचा पगार 1.5 कोटी रुपये जवळपास

मायक्रोसॉफ्ट या जगातील सर्वश्रेष्ठ सॉफ्टवेअर कंपनी चा CEO देखील एक भारतीय आहे. त्यांचं नाव आहे सत्या नदेला. कंपनीच्या कारकिर्दीतील ते तिसरे सीईओ आहेत आणि भारताचे पहिलेच. सत्या नदेला हे मायक्रोसॉफ्ट अगोदर सन मिक्रोसिस्टम मध्ये काम करायचे. 1992 मध्ये त्यांनी मायक्रोसॉफ्ट जॉईन केली. तेंव्हा पासून ते कंपनीत वेगवेगळी पदांवर काम करून CEO बनले.

२०११मध्ये मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड अँड एन्टरप्राईज विभागाची धुरा हाती आल्यानंतर त्यांनी आपले कौशल्य आणि नेतृत्वगुणांच्या बळावर या विभागाच्या उत्पन्नात भरघोस वाढ करून दाखवली. त्यामुळेच नादेला यांची फेब्रुवारी २०१४ मध्ये “मायक्रोसॉफ्ट‘च्या प्रमुखपदी नियुक्ती झाली.

2.सुंदर पिचाई (Sunder pichai)

 • CEO: गूगल(Google)
 • पगार:332 करोड़ रुपये  (50 millones dollers)
 • दिवसाचा पगार 90.95 लाख रुपये जवळपास

हे भारतीय वंशाचे उद्योगपती व गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. हे मुळचे तमिळनाडूचे रहिवाशी असुन त्यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था, खड्गपूर येथून धातूशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. खरगपूर येथून बी.टेक. झाल्यावर सुंदरराजन पिचई यांनी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून एम.एस. व युनिव्हर्सिटी ऑफ पेनीसिल्वानियाच्या व्हार्टन स्कूलमधून एम.बी.ए. केले.

सुंदर २००४ साली गुगल कंपनीत नोकरीला लागले. गुगलच्या गुगल ड्राइव्ह, गुगल क्रोम आणि क्रोम ऑपरेटिंग सिस्टिमच्या निर्मितीची जबाबदारी समर्थपणे सांभाळल्यामुळे अवघ्या ११ वर्षांच्या सेवेनंतर, त्यांच्यावर गुगलच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याची जबाबगारी सोपवण्यात आली आहे.

3. इंद्रा नूयी (Indra Nooyi)

 • CEO: पेप्सी को (Pepsi co)
 • पगार:175 करोड़ रुपये  (50 millones dollers)
 • दिवसाचा पगार 47.94 लाख रुपये जवळपास

इंद्रा नूयी हे पेप्सिको या कंपनीच्या २ मे २००६ पासून चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. त्यांचे नागरिकत्व अमेरिकन असून, जन्माने त्या भारतीय आहेत.

फोर्ब्स मासिकाच्या ’जगातील १०० शक्तिशाली महिलां‘च्या यादीत इंद्रा नूयी यांना तेराव्या क्रमांकावर स्थान मिळाले होते. २००६ मध्ये त्यांची पेप्सीकोच्या सीईओपदी नियुक्ती झाली. इंद्रा नूयी या ’फॉर्च्युन ५००‘ कंपन्यांच्या एकूण ११ “सीईओ‘पैकी एक आहेत.

4.राकेश कपूर (Rakesh kapoor)

 • CEO: रैकिट बेंकिसेर(reckitt benckiser)
 • पगार:153 करोड़ रुपये  (23 millones dollers)
 • दिवसाचा पगार 41.91 लाख रुपये जवळपास

बरेली येथे जन्मलेले राकेश कपूर हे प्रसिद्ध कंपनी reckitt benckiser या कंपनी चे CEO आहेत. कपूर यांच शिक्षण मॉडर्न स्कूल न्यू दिल्ली इथे झालं. पुढे त्यांनी केमिकल इंजिनियरिंग ची डिग्री बिरला इन्स्टिट्यूट मधून मिळवली.

त्यांनी reckitt benckiser या कंपनीला 1987 मध्ये जॉईन केली होती, तेंव्हा पासून ते कंपनी च्या सर्व अपेक्षांवर खरे उतरले. म्हणून कंपनी ने शेवटी त्यांना मुख कार्यकारी अधिकारी CEO बनवले. ही कंपनी डेटॉल, डुरेक्स, एअर वीक, लाईसॉल, व्हॅनिश सारखे सुप्रसिद्ध प्रॉडक्ट बनवते.

5.शांतनु नारायण(Shantanu Narayan)

 • CEO: एडोब (Adobe)
 • पगार:119 करोड़ रुपये  (17.80 millones dollers)
 • दिवसाचा पगार 32.60 लाख रुपये जवळपास

शंतनू नारायण यांनी ॲपल या संगणक कंपनीमधून करिअरला सुरुवात केली. त्यांनी नंतर महाजालाटवर डिजिटल फोटो शेअरिंगची संकल्पना सर्वप्रथम प्रत्यक्षात आणणारी पिक्ट्रा‘ कंपनी स्थापन केली. शंतनू नारायण यांनी १९९८ मध्ये ॲडॉब सिस्टिम्स कंपनीत काम करायला सुरुवात केली व १ डिसेंबर २००७ रोजी ते कंपनीचे सीईओ झाले.

हैद्राबाद चे शनतनू नारायण याना जगातील सुप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी ऍडोब (Adobe) ने फक्त 9 वर्षाच्या कामगिरी नंतर त्यांची CEO म्हणून बडती केली. ते आज जगातील जास्ती पगार असलेले CEO मध्ये येतात.

                      Source :marathimotivation

 

आपला व्यवसाय KALPATAROO वर LISTING करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा..
KALPATAROO हे  FACEBOOK पेज लाईक करण्यासाठी येथे CLICK करा.

धन्यवाद..

गुगल देणार पदवीधर युवकांना नोकरी..


इंटरनेटवर जायंट सर्च इंजिन असलेले गुगल पदवीधर युवकांना नोकरी देणार असून गुगल टेक्निकल आणि सेल्स-मार्केटिंगमध्ये नोकरीची संधी देत आहे. गुगलमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे. या नोकरीसाठी शेवटच्या सेमिस्टरमध्ये शिकणारे विद्यार्थीही अर्ज करु शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना गुरुग्राममध्ये जाऊन नोकरी करावी लागेल. गुगल फ्रेश आयडिया, इंफॉरमेशन रिट्रायव्हल, डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंग, लार्ज स्केल सिस्टिम डिझाईन, नेटवर्किंग अॅण्ड डेटा स्टोरेज असणाऱ्यांना नोकरी देणार आहे.

सेल्स अॅण्ड अकाऊंट मॅनेजमेंट पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीए/ बीएएसची पदवी किंवा त्या योग्यतेची पदवी असावी लागणार आहे. त्याचबरोबर IaaS किंवा PaaS प्रॉडक्टमध्ये काम करण्याचा २ वर्षांचा अनुभव आणि इंग्लिश बोलणे आणि लिहिणे आले पाहिजे. तसेच टेक्निकल/ सेल्स इंजिनिअरिंगमध्ये आणि सीआरएम सिस्टिममध्ये अनुभव असणे आवश्यक आहे. क्लाऊड कॉम्प्युटिंग मार्केट आणि टेक्नोलॉजीचा समज, गुगल क्लाऊड प्रोडक्टची माहिती असणे गरजेचे आहे.

सॉफ्टवेअर इंजिनिअर पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कंप्युटर सायन्समध्ये बीए/बीएस पदवी किंवा त्या योग्यतेची पदवी असावी लागणार आहे. त्यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा अनुभव, वेब अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट, Unix/Linux environments, मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट, मशीन लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, नेटवर्किंग डेव्हलपिंग लार्ज सॉफ्टवेअर सिस्टिमचा अनुभव आणि इंग्लिश बोलणे आणि लिहिणे आले पाहिजे. तसेच मास्टर्स, पीएचडी, किंवा कोणत्याही टेक्निकल फील्डचा अनुभव आणि Java, C/C++, C#, Objective C, Python, JavaScript, or Go यातील एकाचा अनुभव असणे आवश्यक आहे. दुसरी को़डिंग भाषा शिकण्याची योग्यता असली पाहिजे. याबाबतची अधिक माहिती https://careers.google.comया वेबसाईटवर मिळू शकते. तसेच या वेबसाईटवरूनच तुम्ही नोकरीसाठी अर्जही करु शकता.

       Saurce : majhapaper


गुगल एक आविष्कार ….

How was Google invented ?

लॉरेंस उर्फ लॅरी पेज आणि सर्जे ब्रेन, गुगलचे संस्थापक !

तर गोष्टीला सुरुवात होते अगदी वीसेक वर्षांपूर्वी, सन १९९६ मध्ये, ज्यावेळी आपल्या कथेतील दोन्ही मध्यवर्ती पात्रे कॅलिफोर्नियातील स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडी करत होते.

लॅरी पेज त्याच्या रिसर्च पेपरसाठी विषय शोधत होता, तेव्हा ‘वर्ल्ड वाईड वेबच्या गणितीय गुणधर्मांचे अन्वेषण आणि वेबच्या लिंक स्ट्रक्चरचा एक प्रचंड आलेखस्वरुपात अभ्यास’ हा विषय घ्यावा असं त्याला वाटलं.

त्याच्या या विचाराला त्यांचे पर्यवेक्षक सर टेरी विनोग्रॅड यांनी प्रोत्साहन दिलं आणि ह्याच विषयावर रिसर्च करण्याच्या त्यांच्या या सल्ल्याला पेज ‘आजवर त्याला मिळालेला सर्वोत्तम सल्ला’ म्हणतो, कारण याच रिसर्च पेपरची फलश्रुती ‘गुगल’ नावाच्या जादूगारात झाली.

पेजने सरांचा सल्ला योग्य मानून नानाविध पेजेसच्या लिंक्स, त्यांची संख्या आणि त्यांचे गुणधर्म या आधारावर, दिलेल्या/होमपेजशी जोडण्याच्या पद्धतींवर लक्ष केंद्रित केले. या त्याच्या रिसर्च पेपरला त्याने ‘बॅकरब’ असं नाव दिलं आणि या बॅकरब च्याच प्रक्रियेमध्ये लॅरी पेजला आपलं दुसरं मुख्य, सर्जे ब्रिन जॉईन झाला.

खरंतर सर्जे ब्रिन हा पेजचा आधीपासूनचा, १९९५ पासूनचा, फार जवळचा असलेला एक हुशार मित्र होता आणि त्याला नॅशनल सायन्स फाउंडेशन ग्रॅज्युएट फेलोशिप मिळालेली होती. ते दोघेही स्टँडफोर्ड डिजिटल लायब्ररी प्रोजेक्ट(SDLP) वर सोबत काम करत होते.

एक, एकत्रित आणि सार्वत्रिक लायब्ररी स्थापन करण्यासाठी आणि चालवण्यासाठी सॉफ्टवेअर निर्माण करणे हे SDLP चे मुख्य उद्दिष्टे होते.

ह्या प्रोजेक्टला नॅशनल सायन्स फाउंडेशनकडून निधी मिळाला होता. या प्रोजेक्टमध्ये पेज आणि ब्रिन सोबतच इतर काही हुशार विद्यार्थी काम करत होते. आणि या प्रोजेक्टचा गुगलच्या संकल्पनेमागे सिंहाचा वाटा आहे.

मार्च १९९६ मध्ये, लॅरी पेजने स्टँडफोर्डच्या होमपेज ला स्टार्टिंग पॉईंट धरून त्याच्या वेब क्रॉलरने वेबच्या अन्वेषणाला सुरुवात केली. दिलेल्या पेजेससाठी संग्रहित केलेल्या बॅकलिंक्सवरील डेटाला महत्त्वपूर्ण स्वरूपात रूपांतरित करण्यासाठी पेज आणि ब्रिन यांनी पेजरँक अल्गोरिदम निर्माण केला.

त्यानंतर दिलेली URL आणि महत्त्वानुसार क्रमित केलेली बॅकलिंक्सची यादी यांच्या आधारावर ‘बॅकरब’ या सर्च इंजिनचे आऊटपुट चेक करताना पेजरँक अल्गोरिदमवर आधारित सर्च इंजिन हे त्याकाळातील कुठल्याही इतर सर्च इंजिनपेक्षा उत्तम काम करू शकते, असे एक निरीक्षण निघाले.

यानंतर पेज आणि ब्रिन यांचे लक्ष या निरीक्षणावर केंद्रित झाले आणि इतर मुख्य पाने संग्रहाला जोडून आणखी काही चाचण्या घेतल्या गेल्या. या सगळ्या चाचण्यांतून पूर्वी केलेले निरीक्षण सत्य असल्याचाच निष्कर्ष आला आणि पेज-ब्रिन नव्या सर्च इंजिनच्या निर्मितीकडे वळले.

या सर्च इंजिनचे नाव ‘गुगोल’ या फार मोठ्या संख्येच्या अपभ्रंशावरून ‘गुगल’ असे ठेवले गेले.

‘पेजरँक’ या आपल्या रिसर्चपेपरमध्ये या नावाबद्दल सांगताना पेज आणि ब्रिन म्हणतात-

“आम्ही, आमच्या सिस्टमसाठी ‘Google’ हे नाव निवडले आहे; कारण Google हा गूगोल( googol/10100 / १ पुढे १००० शून्य) चा एक सामान्य अपभ्रंश आहे, आणि फार मोठ्या प्रमाणावर कार्यरत असणाऱ्या सर्च इंजिनाची निर्मिती करण्याच्या आमच्या ध्येयाशीच निगडित आहे.”

                                                                                                                                          source : Inmarathi.com


‘टेस्ला मोटर्स’ या बॅटरीवर चालणाऱ्या मोटार कंपनीची २००३ साली स्‍थापना झाली, तेव्हा इलॉन मस्क हे त्याचे सहसंस्थापक असले तरी प्रमुख भूमिकेत नव्हते. पुढे त्यांनी तो प्रकल्प आपल्या हाती घेतला आणि त्यांनी २००८ मध्ये आपली पहिली ‘टेस्ला रोडस्टर’ ही इलेक्ट्रिकल गाडी बाजारात आणून कंपनीकडे जगाचे लक्ष वेधून घेतले. २०१२ मध्ये त्यांनी ‘मॉडेल एस’ ही आलिशान इलेक्ट्रिकल मोटार आणली. बाजारात आणल्यापासून अवघ्या साडेचार वर्षांत त्यांनी जगभरात दीड लाख मोटारी विकल्या. गेली दोन वर्षे त्यांच्या मोटारीला सर्वोत्कृष्ट गटात सन्मान प्राप्त होत आहे.टेस्लाने केलेल्या अभ्यासातून त्यांच्या लक्षात आले होते की प्रदूषणमुक्त मोटार ही केवळ फॅशन आहे. श्रीमंतांना आपणही पर्यावरणस्नेही आहोत हे दाखवायचे असते. मात्र त्यांना गाडी मात्र स्टायलिश चालवायची असते. त्यामुळे मोटार फालतू दिसण्याऐवजी ती अत्यंत आकर्षक दिसेल याची काळजी घेत त्यांनी अन्य मोटारींना तुल्यबळ अशी जबरदस्त मोटार तयार केली. इतकी की हॉलीवूडचा सुपरस्टार लिओनार्ड डिकॅप्रियोने टेस्लाची मोटार चालवायला सुरुवात केली. मोटार म्हटली की ती स्टायलिश असायलाच हवी आणि ती बापुडी दिसण्याची आवश्यकता नाही, हे जाणवून त्यांनी नेमकेपणाने त्यावर काम करून यश मिळवले.

इलेक्ट्रिकल मोटारींबद्दल त्यांचे सौंदर्य, वेग, कार्यक्षमता आदीबद्दल अनेक शंका असतात; म्हणून ही गाडी लोक गंभीरपणे घेत नाहीत; त्याकडे एकतर फॅड म्हणून पाहतात किंवा हौस म्हणून! इलॉन मस्क यांनी मात्र हा दृष्टिकोन बदलण्यासाठी, गाडीला मुख्य प्रवाहातील वाहन मानले जावे आणि अन्य मोटारींशी त्याची स्पर्धा असावी, यासाठी काही महत्त्वाची पावले उचलली.

गेल्या वर्षी त्यांनी ‘मॉडेल ३’ मोटार लाँच केली आणि ती जगातील सर्वाधिक वेगवान असल्याचे सिद्ध करून दाखवले. बीएमडब्ल्यु आणि मर्सिडिज मोटारींच्याच दरात त्याहीपेक्षा अधिक वेगवान इलेक्ट्रिकल कार मिळत असल्याने ग्राहकांनीही त्याचे उत्तम स्वागत केले. फक्त अर्धा तास चार्जिंग करून सुमारे पावणे तीनशे किलोमीटर अंतर या कारने कापता येते. या यशाचे रहस्य काय, हे पाहण्यासारखे आहे.

 

टेस्लाचे तंत्रज्ञान इतके सरस आहे की डेम्लर, मर्सिडिज बेन्झ, टोयोटा आदी कंपन्या ते वापरतात. जनरल मोटर्सने तर टेस्लाच्या भविष्यकालीन वाटचालींचा वेध घेण्यासाठी एका खास टीमची नेमणूक केली आहे, असे म्हणतात.
त्याआधी आपल्याच सुमारे तीस हजार कर्मचाऱ्यांना ही मोटार विकून त्यांनी त्यातील अनेक दोष दूर केले. ग्राहकांपर्यंत कार जाण्याआधी कंपनीतच गाडी विकून चाचणी आणि विक्री एकत्रितच केली आणि एक महत्त्वाचा टप्पा कमी करण्याचा दूरदर्शीपणा दाखवला. (गाडीच्या दुरुस्तीसाठी ग्राहकाला अन्यत्र कोठेही जायला लागत नव्हते; फक्त कामाच्या ठिकाणीच गाडी आणली की झाले!)

त्यांना स्पर्धक नाहीत. कारण त्यांनी एका छोट्या ग्राहक वर्गासाठी उत्पादन बनवले आहे. उच्च प्रतीची इलेक्ट्रिक स्पोर्टस्कार. त्यामुळे या क्षेत्रात त्यांची मक्तेदारी असल्याने ते यशस्वी आहेत. तसेच, टेस्लात काम करणारे लोक हे कमांडो सारखे असतात. इलॉन मस्क त्यांच्याकडून कस लागेल असे काम करून घेतात. ते सामान्य दर्जा स्वीकारतच नाहीत, उलट अशक्यप्राय गोष्टींचा आग्रह धरतात.

वितरण ही त्यांची अजून एक महत्त्वाची बाजू. अनेक कंपन्या या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात, मात्र टेस्लाने ते सुरुवातीपासून मनावर घेतले. त्यासाठी त्यांनी अमेरिकेतील काही राज्यांशी संघर्ष करावा लागला तरी तो केला आणि आपली सेवा केंद्रे सुरू केली. ते वितरकांच्या जाळ्याविना थेट विक्री करत असल्याने त्यांना प्रारंभी खूप अधिक खर्च येत असला तरी भविष्यात त्यांना त्याचा अधिक फायदा होणार आहे. शिवाय, ग्राहकांचा अनुभव थेट प्राप्त होत असल्याने त्यांच्या ‘ब्रँड मूल्या’त भरच पडते.

 

आपला व्यवसाय KALPATAROO वर LISTING करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा..
KALPATAROO हे  FACEBOOK पेज लाईक करण्यासाठी येथे CLICK करा.

धन्यवाद …

आज आपण आपल्या छोट्याश्या व्यवसायाला यशस्वी कसे बनवाल हे जाणून घेऊया.

 सर्वात महत्त्वाचे म्हणजे …

१. तुमचा ग्राहक कोण आहे ते शोधा ?

कुठलाही व्यवसाय करण्याच्या  आधी तुमचा ग्राहक कोण आहे ते शोधलं पाहीजे. उदा. एखाद्या स्टायलिश कपड्यांच्या दुकानातला ग्राहक मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय असेल, ते कपडे घेण्याची लो इन्कम ग्रुप मधल्या लोकांची ऐपत नसेल, तेव्हा टारगेट कस्टमर शोधा, त्यांच्याशी संपर्क वाढवा.

कॉलेजची मुले, स्टायलिश राहतात, त्यासाठी खर्च करण्याची त्यांची तयारी असते, मग जमल्यास त्यांची एखादी मोठी गॅदरींग, एखादा इव्हेन्ट स्पॉन्सर करा. आपली जाहीरात आपल्या संभाव्य ग्राहकाला, आपल्यापर्यंत घेऊन आली पाहीजे.

२. आकर्षक लोगो आणि टॅगलाईन तयार करा ..

लोगो असणं, खुप आवश्यक आहे, कालांतराने ती आपली ओळख बनतं. सर्वप्रथम कुठेही, आपलं लक्ष पहील्यांदा लोगोवर जातं. नकळत ग्राहकाच्या मनात आपली ‘ब्रॅंड बिल्डींग’ चालु होते. लोगो ग्राहकांच्या मनावर लवकर ठसतो. ब्रॅंड आहे म्हणजे चांगलाच असणार असे आपल्या बाजुने त्याचे विचार आपोआप वळु लागतात.

लोगो असा असावा, की अधिक माहीती न सांगता तुमचं उत्पादन, किंवा तुमची सेवा, चटकन ग्राहकाला कळाली पाहीजे, जर तुमच्या लोगोतुन तुमच्या व्यवसायाचा बोध होत नसेल, तर लोगो बदला, अधिक सुलभ, अधिक आकर्षक करा.

लोगोमुळे तुमचा व्यवसाय इतरांपेक्षा वेगळा असा, उठुन दिसतो. तुम्हाला डिझाईन येत नसेल तर प्रोफेशनल लोकांची मदत घ्या, देखणा लोगो बनवुन व्हिजीटींग कार्ड, ऑफीस, दुकानाचा डिस्प्ले, जाहीराती यात मनसोक्त त्याचा वापर करा. ती तुमची युनिक ओळख बनते.

३. आपल्या व्यवसायच एक विशिष्ट ध्येय ठरवा ..

आपण करत असलेला व्यवसाय बाजारात हजारो लोक करत आहेत, तेव्हा तुम्ही तुमच्या ग्राहकाला काहीतरी वेगळं दिलं पाहीजे, तर तो तुमच्याकडे आकर्षित होईल आणि तुमच्या वेगळेपणामुळे कायमचा ग्राहक बनेल. तुमचा प्रॉडक्ट इतरांपेक्षा कसल्या ना कसल्या प्रकारे सरस असला पाहीजे.

ग्राहकाला तुम्ही काय देणार आहात हे स्पष्ट करणं, म्हणजे व्हिजन आणि मिशन स्टेटमेंट. तुमचं व्हिजन आणि मिशन तुमच्या व्यवसायाला पुढे घेऊन जाण्यात खुप मदत करतं. पदोपदी तुम्हाला मार्गदर्शन करतं.

नाईके जगातली शुज बनवणारी एक उत्कृष्ट कंपनी, त्यांचे मिशन स्टेटमेंट आहे, तुम्ही एथलिट असाल आमचे शुज वापरा, ते बेस्ट आहेत. त्यांनी सोबत अजुन एक वाक्य जोडून स्वतःला व्यापक केले.

“ज्याच्याकडे बॉडी आहे, तो एथलिट आहे.” नकळत त्यांनी प्रत्येकाला स्वतःचा ग्राहक बनण्याचं निमंत्रण दिलं.

आपण आपल्या संभाव्य ग्राहकाला आपल्याकडे येण्याचं, निमंत्रण देतो का? …… जो ग्राहक आला, त्याला वेगळी आणि खास ट्रीटमेंट देतो का?….दर्जेदार आणि आगळवेगळं उत्पादन, सेवा देतो का?

काहीतरी वेगळं म्हणजे तुमचा नम्रपणा असु शकतं, तुमचा प्रामाणिकपणा, तुमची कस्टमरबद्दल आपुलकी, तुमचं त्यांना आदरानं बोलणं हेही असु शकतं, आजकालच्या प्रोफेशनल जगात बहुतांश लोक आपापल्या तोऱ्यात वावरत असतात, तेव्हा मन जिंकुन, माणसं आपलीशी करण्याराला तसा बराच स्कोप आहे.

 ४. स्वतःमधल्या कमतरता शोधा ..

मार्केटवर बारकाईने लक्ष ठेवुन, तुमचे स्पर्धक कोणत्या बाबतीत वरचढ आहेत, त्याचा अंदाज घ्या. मग स्वतःमध्ये सुधारणा कशी करता येईल, ते शोधा. उदा. नवीन सॉफ्टवेअर शिकणं, ऑफीसला, दुकानाला, चांगलं इंटीरीअर बनवणं, मनुष्यबळ वाढवणं, व्यवसायाला उपयोगी पडणार्या नवनव्या स्किल्स शिकणं.

आपला स्पर्धक आपल्यापेक्षा लोकप्रिय असेल तर आपण आणखी कायकाय केल्याने त्यापेक्षा जास्त चांगले बनु याचा सतत विचार करा.

५.आपल्या व्यवसायाची चांगली मार्केटिंग करा…

आपलं प्रॉडक्ट खुप छान आहे हे फक्त आपल्याला  माहीत असुन चालणार नाही, त्याला जगासमोर आकर्षक स्वरुपात मांडावं लागेल.

घरात वाट बघत बसल्याने कस्टमर येत नाही. पहीले काही हजार कस्टमर तुम्ही शोधा, तुमच्या उत्पादनात खरच दम असेल तर नंतर कस्टमर तुम्हाला शोधत येतील.त्यामुळे आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करा.मार्केटिंग मध्ये आपण अनेक गोष्टी करू शकतो जसे ..सोशल मिडीया , वेगवेळ्या business listing site वर आपलं व्यवसाय listing करणे , पोम्पलेट ,ई..
आपला व्यवसाय kalpataroo वर listing करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा..
KALPATAROO हे  FACEBOOK पेज लाईक करण्यासाठी येथे CLICK करा

धन्यवाद ….

 

 

 

 

 

 

 

 

      मी कोणता व्यवसाय करावा ?

    मागील काही वर्षात काही नवीन व्यवसाय जन्माला आलेत . जसे ऑनलाइन शॉपिंग, तिकीट बुकिंग, मोबाइल recharge सेंटर, Mobile चा विमा पण आलाय. आधी लोकांना दूरदर्शन पाहून मजा यायची पण आज शेकडो tv channels कमी पडून लोकांना youtube पाहिजे आहे.  मागील १० वर्षात काही व्यवसाय जन्माला आले तर काही मरण पावले. मग मी कोणता व्यवसाय करावा ?

आज Jack Ma यांनी चीन मध्ये Alibaba.com हि वेबसाईट सुरु केली, यामुळे अनेक छोटे व्यवसाय एकमेकांशी जोडले गेले. त्यामुळे छोटे व्यावसायिकांना फायदा झाला आणि अर्थातच त्याचा फायदा सामान्य लोकांना पण झाला.

Steve Jobs यांनी Apple कंपनी सुरु केली. Apple मुळेच फोन च्या जगात इतक्या झपाट्याने प्रगती झाली. आज आपण कितीतरी गोष्टींसाठी फोनचा वापर करतोय.

Bill Gates यांनी Microsoft कंपनी बनवली. त्यामुळे computer सहज वापरणे आज जगाला शक्य झाले. या सर्व लोकांनी जग बदलण्यात मदत केली नाही का ?

सांगण्याचा मुद्दा असा की, व्यवसाय करताना आपण आपल्या व्यवसायाच्या माधम्यातून या जगाला, मानव समाजाला काय देऊ शकतो याचा विचार करून आपण व्यवसायाला सुरवात केली पाहिजे.

 

KALPATAROO हे  FACEBOOK पेज लाईक करण्यासाठी येथे CLICK करा