Dec
18

गुगल एक आविष्कार …. how google was invented ?

गुगल एक आविष्कार ….

How was Google invented ?

लॉरेंस उर्फ लॅरी पेज आणि सर्जे ब्रेन, गुगलचे संस्थापक !

तर गोष्टीला सुरुवात होते अगदी वीसेक वर्षांपूर्वी, सन १९९६ मध्ये, ज्यावेळी आपल्या कथेतील दोन्ही मध्यवर्ती पात्रे कॅलिफोर्नियातील स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडी करत होते.

लॅरी पेज त्याच्या रिसर्च पेपरसाठी विषय शोधत होता, तेव्हा ‘वर्ल्ड वाईड वेबच्या गणितीय गुणधर्मांचे अन्वेषण आणि वेबच्या लिंक स्ट्रक्चरचा एक प्रचंड आलेखस्वरुपात अभ्यास’ हा विषय घ्यावा असं त्याला वाटलं.

त्याच्या या विचाराला त्यांचे पर्यवेक्षक सर टेरी विनोग्रॅड यांनी प्रोत्साहन दिलं आणि ह्याच विषयावर रिसर्च करण्याच्या त्यांच्या या सल्ल्याला पेज ‘आजवर त्याला मिळालेला सर्वोत्तम सल्ला’ म्हणतो, कारण याच रिसर्च पेपरची फलश्रुती ‘गुगल’ नावाच्या जादूगारात झाली.

पेजने सरांचा सल्ला योग्य मानून नानाविध पेजेसच्या लिंक्स, त्यांची संख्या आणि त्यांचे गुणधर्म या आधारावर, दिलेल्या/होमपेजशी जोडण्याच्या पद्धतींवर लक्ष केंद्रित केले. या त्याच्या रिसर्च पेपरला त्याने ‘बॅकरब’ असं नाव दिलं आणि या बॅकरब च्याच प्रक्रियेमध्ये लॅरी पेजला आपलं दुसरं मुख्य, सर्जे ब्रिन जॉईन झाला.

खरंतर सर्जे ब्रिन हा पेजचा आधीपासूनचा, १९९५ पासूनचा, फार जवळचा असलेला एक हुशार मित्र होता आणि त्याला नॅशनल सायन्स फाउंडेशन ग्रॅज्युएट फेलोशिप मिळालेली होती. ते दोघेही स्टँडफोर्ड डिजिटल लायब्ररी प्रोजेक्ट(SDLP) वर सोबत काम करत होते.

एक, एकत्रित आणि सार्वत्रिक लायब्ररी स्थापन करण्यासाठी आणि चालवण्यासाठी सॉफ्टवेअर निर्माण करणे हे SDLP चे मुख्य उद्दिष्टे होते.

ह्या प्रोजेक्टला नॅशनल सायन्स फाउंडेशनकडून निधी मिळाला होता. या प्रोजेक्टमध्ये पेज आणि ब्रिन सोबतच इतर काही हुशार विद्यार्थी काम करत होते. आणि या प्रोजेक्टचा गुगलच्या संकल्पनेमागे सिंहाचा वाटा आहे.

मार्च १९९६ मध्ये, लॅरी पेजने स्टँडफोर्डच्या होमपेज ला स्टार्टिंग पॉईंट धरून त्याच्या वेब क्रॉलरने वेबच्या अन्वेषणाला सुरुवात केली. दिलेल्या पेजेससाठी संग्रहित केलेल्या बॅकलिंक्सवरील डेटाला महत्त्वपूर्ण स्वरूपात रूपांतरित करण्यासाठी पेज आणि ब्रिन यांनी पेजरँक अल्गोरिदम निर्माण केला.

त्यानंतर दिलेली URL आणि महत्त्वानुसार क्रमित केलेली बॅकलिंक्सची यादी यांच्या आधारावर ‘बॅकरब’ या सर्च इंजिनचे आऊटपुट चेक करताना पेजरँक अल्गोरिदमवर आधारित सर्च इंजिन हे त्याकाळातील कुठल्याही इतर सर्च इंजिनपेक्षा उत्तम काम करू शकते, असे एक निरीक्षण निघाले.

यानंतर पेज आणि ब्रिन यांचे लक्ष या निरीक्षणावर केंद्रित झाले आणि इतर मुख्य पाने संग्रहाला जोडून आणखी काही चाचण्या घेतल्या गेल्या. या सगळ्या चाचण्यांतून पूर्वी केलेले निरीक्षण सत्य असल्याचाच निष्कर्ष आला आणि पेज-ब्रिन नव्या सर्च इंजिनच्या निर्मितीकडे वळले.

या सर्च इंजिनचे नाव ‘गुगोल’ या फार मोठ्या संख्येच्या अपभ्रंशावरून ‘गुगल’ असे ठेवले गेले.

‘पेजरँक’ या आपल्या रिसर्चपेपरमध्ये या नावाबद्दल सांगताना पेज आणि ब्रिन म्हणतात-

“आम्ही, आमच्या सिस्टमसाठी ‘Google’ हे नाव निवडले आहे; कारण Google हा गूगोल( googol/10100 / १ पुढे १००० शून्य) चा एक सामान्य अपभ्रंश आहे, आणि फार मोठ्या प्रमाणावर कार्यरत असणाऱ्या सर्च इंजिनाची निर्मिती करण्याच्या आमच्या ध्येयाशीच निगडित आहे.”

                                                                                                                                          source : Inmarathi.com

One Comment

  • Omkar prakash shejul
    11 months ago

    This is too important information.

Leave a Reply